Friday 13 October 2017

शेती व पशुपालन प्रोजेक्ट

               विज्ञान आश्रम पाबळ
          डिप्लोमा इन बेसिक रुरल टेक्नॉलॉजी ( डी. बी. आर.टी. )
                                                    सन २०१७-१८
                                प्रकल्प
           
         विभाग - शेती व पशुपालन

प्रकल्पाचे नाव -   पॉलीहाऊसमध्ये मल्चिंग पेपरवर गुलाब लागवड.

विद्यार्थ्याचे नाव - १] संदेश सुरेश टाव्हरे.
               
                  २] प्रथमेश अविनाश गावडे.

प्रकल्पसुरु करण्याचा दिनांक -  ८ - ८ - २०१७.

प्रकल्प समाप्ती दिनांक - १० - १० - २०१७.

मार्गदर्शक शिक्षक - रणजीत शानबाग सर.
                 
                  सचिन लोखंडे सर.

                  
 



                                        अनुक्रमणिका 


अ.नं
विषय
प्रस्तावना
उद्देश
साहित्य \ साधने  
नियोजन
कृती
विविध रोग व उपाय
विविध किडे
छाटणी
प्रतवारी व उत्पन्न
१०
खर्च  
११
संदर्भ




     
                 १} प्रस्तावना.
        मोठ-मोठ्या बाजारपेठांमध्ये गुलाबाला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत आहे. गुलाबाची वाढती मागणी लक्षात घेतल्यास गुलाबाचे लोक  पिक खूप कमी प्रमाण घेत आहेत. गुलाबाचे पिक घेण्यासाठी विविध अडचणी येतात. त्यामध्ये प्रामुख्याने गुलाबावर येणारे विविध रोग- किडी पाण्याची भासणारी कमतरता तसेच गुलाबपिकासाठी आवशक असणारे तापमान गुलाबाचे योग्य व्यवस्थापन. अशा विविध अडचणी येतात तसेच सूर्याची वाढती उष्णता यामुळे आम्ही गुलाबाची लागवड पॉलहाऊसमध्ये करायचे ठरवले. गुलाब पिकासाठी येणाऱ्या विविध अडचणी लक्षात घेवून तसेच पॉलीहाऊसमध्ये मल्चिंग पेपरवर गुलाब कशाप्रकारे येतो हे पाहण्यासाठी आम्ही या प्रकल्पाची निवड केली         
                  
                  २} उद्देश.
     पॉलीहाऊसमध्ये म्लाचींग पेपरवर गुलाब लागवड करणे. गुलाबावर येणाऱ्या विविध रोग-किडींचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करणे. पॉलीहाऊसमध्ये गुलाबाचे उत्तम व भरगोस उत्पादन घेणे.
      
                 
        
         ३} साहित्य
        फावडे,टिकाव,खोरे,घमेले,खुरपे,कौले,बादली.                                                                         
              साधने
झारी,पाईप,मोटार,पी.वी.सी.पाईप,ठिबक सिंचन संच,मल्चिंग पेपर रोल,
फवारणी पंप,  


                
             ४}  नियोजन
सुरवातीला आम्ही गुलाब लावण्यासाठी गुलाबाच्या विविध जाती पहिल्या. त्यापैकी आम्ही टॉपसिक्रेट या जातीचे गुलाब लावायचे ठरवले. त्यानंतर पॉलीहाऊसमध्ये ट्रॅक्टर जात नव्हता त्यामुळे आम्ही हातानेच बेड तयार केले. त्यानंतर लेंडी खताची ट्रॉली भरून खत आणून ठेवले. त्यानंतर लीम्बोली पेन्डच्या २ बॅगा आणून ठेवल्या. मल्चिंग पेपरचा रोल आणून ठेवला. त्यानंतर ठीबकचे सर्व साहित्य जमा करून ठेवले. गुलाब लागवडीची सर्व तयारी करून ठेवली \ नियोजन करून ठेवले . गुलाबाची रोपे आणून ठेवली.                          

              ५}  कृती
       सर्व प्रथम आम्ही बेड तयार करून घेतले. बेडमध्ये लेंडी खत आणलेल्या पैकी आर्धी ट्रॉली लेंडी खत बेडवर टाकले. त्यानंतर लीम्बोळी पेंड व राहिलेले लेंडी खत मिक्स केले. त्यानंतर ते  दोन दिवस झाकून ठेवले. व नंतर ते बेडवर टाकले. त्यानंतर ठिबक लाईन जोडून घेतल्या. ठिबक साठी पाणी आनन्या साठी लागणारी पी. वी. सी. पाईपलाईन जोडून घेतली. त्यानंतर पाणी येते कि नाही याची खात्री केली. त्यानंतर बेडवरती मल्चिंग पेपर अंथरून घेतला. त्यानंतर मल्चिंग पेपरला बेडवर गुलाब लावण्यासाठी ग्लासने होल पाडले. मल्चिंग पेपर पूर्ण बेडला पुरत नव्हता त्यामुळ तो डबल टाकला. त्यानंतर गुलाबाची रोपे आधीच आणून ठेवली होती. ती रोपे लागवडीसाठी घेतली व लागवड केली. त्यानंतर गुलाबाला पाणी दिले. त्यानंतर शेडूल नुसार फवारणी व ड्रीचींग सुरु केले ते पूर्ण २ महिने चालू ठेवले. त्यानंतर गुलाबाची दर आठवड्याला झाडांची उंची पानांची संख्या मोजली. गुलाबावर कोणती कीड-रोग आलेत याचे निरीक्षण केले. त्यावर सरांच्या मदतीने विविध उपाय योजले.      

      
          ६}  विविध रोग व उपाय
१)     भुरी :-
        भुरी हा बुरशीजन्य रोग आहे. स्पेरोथिका पेनोसा नावाच्या बुरशीमुळे होतो. उष्ण - दमट वातावरणात प्रादुर्भाव जास्त आढळतो. पानावर भुरकट पांढऱ्या रंगाची बुरशी वाढून नंतर पानाच्या दोन्ही बाजूस पसरते. बुरशी कळ्या, फुलांचे देठ व कळीच्या मानेखाली पसरते. बुरशी आकुंचन पावतात. कळ्यांनी नैसर्गिक वाढ होत नाही. झाडाची वाढसुद्धा खुंटते.

उपाय :- 
      भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी हार्मोनी २ मिली/लि. याप्रमाणे थ्राईवर, क्रॉंपशाईनर सोबत फवारावे.

२) शेंडा मर :-
           हा बुरशीजन्य रोग आहे. फांदी शेंड्याकडून पाठीमागे काळपट पडून वाळत येते. छाटणीतून होणाऱ्या जखमांमधून बुरशी आत शिरते व मर रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. पावसाळ्यात व पाणथळ जागी रोगाची तीव्रता जास्त असते.

उपाय :- 
      जर्मिनेटर, प्रिझम प्रत्येकी ५ मिली आणि हार्मोनी २ मिली/लि. पाणी याप्रमाणे फवारणी घ्यावी. त्याचबरोबर जर्मिनेटर एक लि./२०० लि. पाण्यातून एकरी मुळावाटे सोडावे.

३) काळे ठिपके :-
              डिप्लोकारपॉन रोझी या बुरशीमुळे रोग होतो. जमिनीलगतच्या जुन्या पानांपासून रोगाची सुरुवात होऊन अनुकूल हवामानात वरपर्यंत पसरतो. पानावर गोलाकार काळपट ठिपके पडतात. रोगट पाने पिवळी पडून थोड्याशा धक्क्याने गळून पडतात. झाड कमकुवत होऊन फुलांची प्रत व उत्पादनावर परिणाम होतो.

उपाय :-
       थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी ३ ते ४ मिली आणी हार्मोनी २ मिली/लि. पाणी याप्रमाणे फवारणी घ्यावी.

४) तांबेरा :-
         फ्रॅग्मीडियम म्युक्रोनॅटम या बुरशीमुळे तांबेरा होतो. हिवाळा व पावसाळ्यात रोगाचा प्रादुर्भाव आढळतो. रोगग्रस्त पाने तपकिरी पडून झाडाची वाढ खुंटते. पानगळ होऊन झाड अशक्त बनते. यामुळे फुलधारणेस उशीर लागतो. 
                                                              
       




       ७}  किडे               
                 
१) सुरवंट :-
          हे किडे पानांच्या शिरामधील भाग खातात, फक्त शिरा शिल्लक राहतात. यामुळे पान जाळीदार बनते. पाने व फुलांच्या कळ्यांचे नुकसान होते. सुरवंटाची अंडी पानाच्या खालील बाजूस आढळतात. किडीचा प्रादुर्भाव झालेल्या फुलांना भाव मिळत नाही.

२) भुंगेरे :-
         भुंगेरे काळपट तपकिरी ते लालसर असतात. ते निशाचर असतात. दिवस तणांमध्ये व बुंध्याजवळ जमिनीत लपून बसतात. आणि रात्री पाने व कोवळी फूट कुरतडतात.
जास्त प्रादुर्भाव असल्यास भुंगेरे फुगलेले डोळे व कळ्या खातात.

३) फुलकिडे :-
           फुलकिडे भुरकट पिवळ्या रंगाचे व लांबट आकाराचे असतात. कोवळे शेंडे. पाने, कळ्या व फुलांच्या पाकळ्या खरडून स्त्रवणारा रस शोषतात. असा भाग प्रथम पांढरा व नंतर तपकिरी होऊन खरचटल्यासारखे डाग पडतात. पाने व फुले आकसून वेडीवाकडी होतात.

५) खवले कीड :-
             काळसर करड्या रंगाची, पापद्यासारख्या आकाराची कीड, खोड व पानांना चिकटलेली असते. खवले एकाच ठिकाणी राहून रस शोषतात. प्रादुर्भाव जास्त झाल्यास फांद्या वाळतात.

६) लाल कोळी :-
             किटक लांबट - गोल व तांबूस रंगाचे असतात. पूर्णावस्थेत आठ गाय असतात. खालच्या बाजूकडील पानांचा रस शोषतात. त्यामुळे पाने निस्तेज बनून झाडातील जोम कमी होतो.


            ८}  छाटणी
* छाटणी (Pruning) :-
                    फुलांची संख्या वाढविण्यासाठी फांदीचा काही भाग काढण्याच्या क्रियेला 'छाटणी' म्हणतात. गुलाबाला नवीन
वाढीवर फुले येतात. जुन्या फांद्यावर फुले येत नाहीत. नवीन फांद्यांची संख्या मर्यादित राहण्यास मदत होते. फांद्यांची गर्दी वाढल्यास झाडाचा आकार बिघडतो. छाटणीत जोमदार वाढीच्या निरोगी फांद्या ठेवून बारीक, कमजोर रोग व कीडग्रस्त, वाळलेल्या, अयोग्य दिशेत वाढणाऱ्या फांद्या* काढाव्यात.

छाटणीचे उद्देश :-
              ) जुनाट भाग व निर्जीव फांद्या काढणे.
               ) फुलांची संख्या वाढविणे.
               ) रोग व कीडग्रस्त फांद्या काढणे. 
             ) फवारणी, फुलांची तोडणी व इतर आंतरमशागती सोप्या करणे.
             ) कोवळ्या, गर्दी करणाऱ्या व वांझ फांद्या काढणे.
             ) योग्य वेळी झाड बहारात आणणे.

झाडाच्या वाढीच्या सुरुवातीला चांगला आकर आणण्याकडे लक्ष द्यावे. निवडक फांद्या ठेवून बाकीचा भाग काढावा. झाड फुलावर येण्यास सुरुवात झाल्यानंतर नियमित छाटणी करावी. छाटणीची तीव्रता लक्षात घेतल्यास, गुलाबाच्या छाटणीचे प्रकार पडतात.

) सौम्य छाटणी (Soft Pruning) :-
                                 फुलांचा बहार व पावसाला संपल्यानंतर छाटणी केली जाते. ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीस छाटणी केली जात असल्याने 'हिवाळी छाटणी' असेही म्हणतात. पावसाळी बहार झाल्यानंतर दुसरा बहार येण्यासाठी ही छाटणी केली जाते. बहार नोव्हेंबरमध्ये सुरू होऊन फेब्रुवारी - मार्चपर्यंत चालतो. सौम्य छाटणीत फांदीचे शेंडे छाटले जातात. यामुळे झाडास फुले भरपूर लागतात, परंतु ती आकाराने लहान असतात.

) मध्यम छाटणी (Medium Pruning) :-
                                      या छाटणीत फांद्याची खरडून अथवा फार उंचीवर करत नाहीत मध्यम उंचीवर म्हणजेच फांदीवर ७ ते ८ डोळे ठेवून छाटणी करतात. छाटणीनंतर ४० ते ५० दिवसांत नवीन फुटीवर फुले येतात. फुले भरपूर व मध्यम ते मोठ्या आकाराची असतात. मध्यम छाटणी झाडाची उंची मध्यम राहून डौलदार वाढतात.

) कडक छाटणी (Heavy Pruning) :-
                                 कडक छाटणी उन्हाळा संपल्यानंतर म्हणजे मे महिन्याच्या शेवटी करावी. फांदीच्या खोडाकडील भागावर ३ ते ४ डोळे राखून छाटणी करावी. कडक छाटणीस 'उन्हाळी छाटणी' असेही म्हणतात. छाटणी उन्हाळ्यात लवकर करू नये. तसे केल्यास कोवळ्या कोंबांना इजा पोहोचते. छाटणी खोलवर केल्याने फुले संख्येने कमी असतात. परंतु आकाराने मोठी असतात.
             ९} फुलांची प्रवारी व उत्पन्न
              
             फुलांची प्रवारी व उत्पन्न :-
                                     लागवड केल्यानंतर साधारणपणे सहा महिन्यांनी फुले लागण्यास सुरुवात होते. सुरुवातीला फुलांची संख्या गुलाबाची कमी असते, परंतु एक वर्षानंतर नियमित व भरपूर फुले येण्यास सुरुवात होते. फुलांच्या बाहेरील एक ते दोन पाकळ्या उमलण्यास सुरुवात झाल्यानंतर त्यांची  देवाला वाहण्यासाठी पूर्ण उमललेली फुले तोडावीत. अशी फुले उघड्या टोपलीत गोळा करावीत.

फुलदाणी वापरण्यासाठी (ट फ्लॉवर्स) १५ ते ६० सेंमी लांबीची देठ ठेवून फुले तोडावीत. निरोगी डोळ्याच्या वरील बाजूस देठावर धारदार चाकूने कट द्यावा. गुलाबपुष्पाची तोडणी सूर्योदयापूर्वी अथवा सूर्यास्तवेळी करावी. त्यामुळे उन्हामुळे होणारे फुलांचे नुकसान टळते. उशिरा तोडल्याने फुलदांडी व फुलांचे आयुष्य कमी होते. अत्तरे तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी फुले उशिरा तोडल्याने सुगंधी द्रव्याचे प्रमाण कमी होते. फुलदांडी (कट फ्लॉवर्स) तोडणी केल्यानंतर फुलांचे देठ मानेपर्यंत पाण्यात बुडवून ठेवावेत. यामुळे फुलांचे आयुष्यमान वाढते. तोडणी संपेपर्यंत फुले सावलीत ठेवावीत.

          प्रतवारी :-
                 तोडणीनंतर सावलीत ठेवलेल्या फुलांची प्रतवारी करावी. सुकलेली व खराब फुले बाजूला काढावीत. चांगल्या व निरोगी फुलांची देठाच्या लांबीनुसार प्रतवारी करावी. जास्त देठाच्या लांबीची फुले चांगल्या प्रतीची समजली जातात. तसेच त्यांना बाजारात किंमत जास्त मिळते. प्रतवारी जाती व रंगानुसार करावी. समान दांडे असलेली ६ किंवा १२ फुले एकत्र बांधून जुड्या खोक्यात पॅक करून बाजारात विक्रीसाठी पाठवाव्यात.

          उत्पादन :-   
प्रतिवर्षी फुलांचे सरासरी एकरी १.२५ लाख फुले मिळतात. दुसऱ्या वर्षापासून स्थिर उत्पादन येते. 
               
               १०}   खर्च
    
अनु   
वस्तू
नग
किमत
लेंडी खत
३४००
मल्चिगपेपर रोल
२४००
लीबोळी पेड
११००
गुलाब रोपे
१,१००
६,६००
ड्रीचिंग

६४०

एकूण खर्च

१४३४०
                         

                  ११} संदर्भ
               कृषी दर्शनी, नेटवरून माहिती मिळवली,





No comments:

Post a Comment