Friday 13 October 2017

शेती व पशुपालन


                  तन निर्मुलन 

शेता मध्ये  पूर्वीचे पीक निघाल्यानंतर हराळी आणि लव्हाळा यासारख्या बहुवार्षिक व इतर तणांचा बंदोबस्त करण्यासाठी जमिनीची उभी- आडवी खोल नांगरट, ढेकळे फोडणे, कुळवणी करणे, तणांचे अवशेष गोळा करून जाळून नष्ट करणे इत्यादी उपाययोजना केल्या जातात. मात्र, मशागत करताना पुढील गोष्टी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. 
1) जमिनीची नांगरट, ढेकळे फोडणे, कुळवणी करणे इ. मशागतीची कामे वेळेवर पूर्ण करावीत. 
2) तणे, धसकटे वेचून जाळून नष्ट करावी. 
3) खतांच्या योग्य मात्रा योग्य वेळी देऊन उसाची जोमदार वाढ करावी. 
4) गाजरगवतासारखी तणे बी येण्यापूर्वीच उपटून टाकावीत. 

निवारणात्मक उपाय

उसामध्ये सुरवातीच्या काळात आंतरपीक घेतल्यास स्पर्धात्मक पद्धतीने तणांच्या योग्य बंदोबस्तासह हिरवळीच्या खताचा फायदा होतो. उसातील दोन ओळींत मोकळ्या जागेवर पाचटाचे आच्छादन केल्यास तणांच्या वाढीस आळा बसतो. 
या तण नियंत्रण पद्धतीत अवजाराचा वापर करून बाळबांधणी करावी, त्यासाठी दातेरी कोळप्याचा वापर करावा. ऊस साडेचार महिन्यांचा झाल्यावर रिजरचा वापर करून मोठी बांधणी करावी. मोठी बांधणी करण्याच्या कालावधीपर्यंत म्हणजे उगवण पूर्ण झाल्यापासून तीन ते साडेचार महिन्यांपर्यंत वेळोवेळी आंतरमशागत करावी, यामुळे तणांचे प्रमाण कमी होते. 

जैविक पद्धतीने तण नियंत्रण

या पद्धतीत तणांवर जगणाऱ्या किडी आणि रोगजंतू यांद्वारे तण नियंत्रण करता येते. उदा. गाजरगवत या तणाचे निर्मूलन झायगोग्रामा बायकलरॅटा (मेक्‍सिकन भुंगा) या जैविक कीटकांद्वारे करता येते. 

रासायनिक तण नियंत्रण



टीप - ऊस उगवल्यानंतर वरंब्यावरील तणांवर तणनाशक फवारावे. तणनाशक ऊस पिकावर पडू देऊ नये. उभ्या उसात तणनाशक फवारणी पंपासाठी डब्ल्यूएफएन- 40 (व्ही आकाराचा) नोझल वापरावा व नोझलवर प्लॅस्टिक हूड बसवावे. 

                      जिवामृत



 1.खरिप पिकांसाठी: प्रमाण प्रती एकर
          पहिली फवारणी: पेरणीच्या 30 दिवसांनी
          100 लिपाणी + 5 लिजीवामृत
          दुसरी फवारणी: पहिल्या फवारणीच्या 20 दिवसांनी
          150 लिपाणी + 10 लिजीवामृत.
          तिसरी फवारणी: दुसऱ्या फवारणीच्या 20 दिवसांनी
          200 लिपाणी + 20 लिजीवामृत.
          शेवटची फवारणी : फळ बाल्यावस्थेत/ दाने दूध अवस्थेत असताना.
          200 लिपाणी + 6 लिआंबट ताक.
2.भाजीपाला पिकांसाठी प्रमाण प्रती एकरी

     1 ली फवारणी : पेरणीनंतर 1 महिन्यानी
      100 लिपाणी + 5 लि.गाळलेले जिवामृत
     2 री फवारणी : पहिल्या फवारणीच्या 10 दिवसांनी
      100 लिनीमास्त्र किंवा 100 लि.पाणी + 3 लि.दशपर्णीअर्क
     3 री फवारणी : दुसऱ्या  फवारणीच्या 10 दिवसांनी
       100 लिपाणी + 2.5 लिआंबट ताक
     4 थी फवारणी : तिसऱ्या  फवारणीच्या 10 दिवसांनी
       150 लिपाणी + 10 लि.गाळलेले जीवामृत

     5  वि फवारणी : चौथ्या फवारणीच्या 10 दिवसांनी
                   150 लिपाणी + 5 लि.ब्रम्हास्त्र  किंवा
                   150 लिपाणी + 5 ते 6 लिदशपर्णीअर्क
     6 वी फवारणी : पाचव्या फवारणीच्या 10 दिवसांनी
                   150 लिपाणी + 4 लिआंबट ताक
     7 वी फवारणी : सहाव्या फवारणीच्या 10 दिवसांनी
                   200 लिपाणी + 20 लि.गाळलेले जीवामृत
     8 वी फवारणी : सातव्या फवारणीच्या 10 दिवसांनी
                   200 लिपाणी + 6 लि.अग्नीस्त्र  किंवा
                   200 लिपाणाी + 8 ते 10 लिदशपर्णीअर्क
     शेवटची फवारणी :आठव्या फवारणीच्या 10 दिवसांनी
                   200 लिपाणी + 6 लिआंबट ताक किंवा
                   200 लिसप्तधान्यांकुर अर्क

3.नविन फळबागांसाठी :प्रमाण  प्रती एकर

     1 ली फवारणी :कलम लावल्यानंतर 1 महिन्यानी
          100 लिपाणी + 5 लिजीवामृत
     2 री फवारणी : पहिल्या फवारणी नंतर 1 महिन्यानी
          150 लिपाणी + 10 लिजीवामृत
     3 री फवारणी :दुसऱ्या फवारणी नंतर 1 महिन्यानी
          200 लिपाणी + 20 लिजीवामृत
व पुढील फवारण्या ह्याच प्रमाणात  ठेवाव्यात.
 प्रतिमाह 200 लिपाणी + 20 लिजीवामृत
     जीवामृत  व पाणी हे नेहमी दुपारी  12 वाजता पडणाऱ्या झाडाच्या सावलीच्या  बाहेर दयावे.

4.उभ्या झाडांमध्ये जीवामृत फवारणी वेळापत्रक :(वय 5 ते 10 वर्ष)
          फळे तोंडणीनंतर तुटलेल्या देठाच्या भागांतुन स्त्राव बाहेर निघतो व त्या स्त्रावाची मेजवानी घेण्यासाठी हानीकारक बुरशी वाढायला लागते व फांदयामध्ये प्रवेश करतात व झाडांना बुरशीजन्य रोग होतातम्हणून  जीवामृताच्या फवारणी व वाळलेल्या काडया काढल्या  पाहिजेत .
      झाडाला विश्रांती दिल्यानंतर व फळ तोंडणी नंतर 2 महिण्यानंतर
               200 लिटर पाणी + 20 लिटर जीवामृत गाळलेले
          ह्य फवारणी नंतर नवीन बहार येईपर्यंत प्रति महिना  फवारणे.  
झाड जेव्हा फुलांवर येतात तेव्हा पासून  कीटकनाशकाच्या फवारण्या कराव्यात
फळ लागल्या नंतर(फळ धारणासुरूवात झाल्यानंतर आलटून पालटून  प्रत्येक 15 दिवसांनी जीवामृत व ताकाची फवारणी करावी   
     प्रमाण: 200 लिटर पाणी + 20 लिटर जीवामृत
           200 लिटर पाणी + 6 लिटर आंबट ताक
जीवामृत 48 ते 72 तासात तयार होतेतयार झाल्यानंतर 7 दिवसांपर्यंत वापरता येते. कारण 7 दिवसांपर्यंत किनवन क्रिया सुरळीत चालू  असते व संजीवकांची   निर्मीती अव्याहत चालू असतेपरंतु 7 दिवसानंतर सडण्याची क्रिया चालू  होते व जीवामृताचा येतो जीवामृतामध्ये बाहेरचे कोणतेही संजीवक  वापरू नयेफक्त जीवामृताची फवारणी करावी.
जीवामृताच्या फवारण्या का?

1)   जीवामृत हे जीवाणूचे  विरजन आहे व सोबतच ते अत्यंत चांगले बुरशी नाशकविषाणू  नाशक आहेत्यामुळे त्याच्या फवारणीने बुरशीविषाणू यांचा प्रादुर्भाव आटोक्यात येते.
2)   कोणत्याही  झाडाचे एक चौरस फुट पान प्रकाश संश्लेषनक्रिये द्वारे सुर्यप्रकाशातून  फोटान कणांचा रुपात  एका दिवसाला 12.5 किलो कॅलरीज गोळा करतेसोबतच मुळयांनी जमिनीतून  घेतलेल्या पाण्याशी व पानांनी           घेतलेल्या कर्बाम्लाचे सोबत रासायनिक संयोग होऊन त्यापासून 4.5ग्रॅम अन्न निर्मिती होतेसंध्याकाळी त्या अन्नाची विल्लेवाट लावले जाते. त्यापैकी काही  अन्न मुळयावाटे जमिनीतील जीवाणुंना खाऊ घातल जाते         व काही अन्न श्वसनासाठी खर्च होतोकाही  अन्न दुसऱ्या दिवशीच्या झाडाच्या वाढीसाठी खर्च होतो व शिल्लक राहिलेल अन्न दाण्याचे  पोषण शेंगा व फळांचे पोषण होण्यासाठी वापरले जाते. किंवा  ऊसाच्या खोडामध्ये साठवले जाते.    या एका दिवसात तयार झालेले अन्न 4.5 ग्रॅम अन्ना पैकी आपल्याला 1.5 ग्रॅम धान्याचे उत्पादन मिळते किंवा 2.25ग्रॅम फळाचे टनेज मिळतं .
              जेव्हा आपण एक चौरसफुट पानांत 4.5ग्रॅम अन्न निर्मिती    करतो तेव्हा आपल्याला 1.5 ग्रॅम अन्नधान्य व 2.25 ग्रॅम फळाचं  टनेज मिळतं     हा टनेज आपल्याला एक चौरसफुट पानावर जमा होणारी 12.5कॅलरी सूर्य ऊर्जा    होयम्हणजे जर आपण पानांचा आकार दुप्पट केला तर आपल्याला टनेजसुद्धा    जास्त मिळेलपानांचा  आकार वाढवणारे हारमोंस जीवामृतामध्ये असतात व   जीवामृतांची फवारणी केल्याने आपल्याला चमत्कार दिसतो.


3)   कधी कधी जोरदार पाऊस झाल्यानंतर किंवा पिकाला पाणी दिल्यानंतर मुळी जवळच्या सगळया पोकळया पाण्यांन भरतात त्यामुळे पोकळयांमधील हवा निघून  जाते व जीवाणूंना  व मुळयांना प्राण वायू मिळत नाही  व पिकं    पिवळ पडतात  कारण जमिनीतून  नत्राचा पुरवठा थांबलेला असतोअशा वेळी  झिरोबजेट नैसर्गिक शेती मध्ये अॅसेटो डायझोट्रॉपीकस जीवामृतांची फवारणी केल्यानंतर जीवामृतात असलेले अॅसेटो डायझोट्रॉपीकस जीवाणू       पानावर पसरतात व हवेतून नत्र घेऊन पानांना देतातएवढेच नाही तर अशा आणीबाणीच्या काळात हवेत तरंगणारे धुळीचे कण हे जीवाणू खेचून घेतात व पानांना खनिजं  उपलब्ध करतात 
              
                      पाणी देण्याच्या  पद्धती 
पाणी देण्याच्या २ पद्धती आहेत -
१) पारंपारिक -
                     १)मोकाट 
                      २) सपाट वाफा 
                     ३)सरी वरंभा 
                     ४)नागमोडी वाफा 
२)अपारंपारिक -
                     १)ठिबक 
                     २)स्पिंक्लर 
ह्या पद्धती शेताला पाणी देण्या च्या आहेत ,
यासाठी साहित्य- खोरे ,टिकाव  हे  लागते 


              साधने - रेडोसर ,ग्रोमेट ,टेकअप ,जोईनेर ,ल्याटरल, कॉक ,ड्रीप ,एंड कॅप ,फ्लश ,स्पिंक्लर 



                                                                           aquaponic
    aqua म्हणजे पाणी ponic म्हणजे शेती म्हणजेच पाण्यावरची शेती यामध्ये असे केले जाते कि दोन लहान शेततळे असतात. एका तळ्यामध्ये मासे पाळायचे आणि दुसर्या तळ्यामध्ये पाणी ठेवायचे. तळ्याच्या वरच्या बाजूला खडक,वाळू,विटा,यापासून तयार करायचे म्हणजे त्यामध्ये पाणी सोडले तर ते पाणी खालच्या बाजूला यावे. माश्यांच्या तळ्यामध्ये असलेले पाणी हे त्यावरती तयार केलेल्या बेडवर दोन दिवसांनी सोडून द्यायचे.
पाणी फिरवण्याची पद्धत मोठ्या तळ्यामधून पाणी लहान तळ्यामध्ये सोडले जाते. लहान तळ्यातून पाणी बेडवर सोडले जाते असे दोन दिवस चालू असते. तिसऱ्या दिवशी पाणी बदलले जाते .

  • पाणी बदलले का जाते ?
मास्यांच्या विष्ठेमध्ये नत्राचे प्रमाण असते.त्यामुळे पाण्यामध्ये नत्राचे प्रमाण वाढले कि ऑक्सिजन चे प्रमाण कमी होते. म्हणून पाणी बदलेले जाते. हे पाणी बेडवरची अळू शोषून घेते आणि त्यावरती वाढते . पाणी परत तळ्यामध्ये जाते . त्यामध्ये हवेतील ऑक्सिजन मिसळला जातो.


  • अश्या प्रकारे पाण्यावर शेती आणि मत्स्य पालन केले जाते.
                  

  फवारणीसाठी लागणाऱ्या पाण्याचे प्रमाण ठरवणे व                     लागणारे औषद ठरवणे 




      आपण ज्या वेळी शेतात फवारणीसाठी जातो त्या वेळी त्या ठिकाणी पाणी उपलब्ध असतेच असे नाही त्यामुळे आपण फवारणी साठी किती पाणी लागते हे समजले पाहिजे त्यसाठी आपण फवारणी साठी किती पाणी लागते हे काढायला शिकले पाहिजे
      फवारणीसाठी  किती पाणी लागते हे काढायला शिकल्यानंतर आपल्याला समजते की आपल्या क्षेत्राला किती पाणी लागते हे समजते व पाण्याची उपलब्धता करण्यास मदत होते व श्रम कमी होतात 


       त्यानंतर आपण फवारणीसाठी लागणारे औषद काढायलाही शिकले पाहिजे कारण काही औषद दुकानदार आपल्याला औषद फवारताना औशादाचे प्रमाण जास्त सांगतात त्यामुळे त्यांची औषद विक्री जास्त होते पण याचा तोटा आपल्याला म्हणजे शेतकऱ्यालाच होतो फवारणीसाठी किती औषद लागते हे शिकल्याने आपला तोटा कमी होतो व आपल्याला नवीन तंत्रज्ञान माहित होते. 



                     शेती विभाग विविध साहित्य व साधने

                             साहित्य

         शेतीची कामे करण्यासाठी आपल्याला विविध साहित्य लागतात ते साहित्य आपण पाहूया. 
       
   १] खुरपे 
   २] खोरे \ फावडे 
   ३] टिकाव \ कुदळ
   ४] विळा 
   ५] घमेले 
   ६] नांगर 
   ७] पहार 
   ८] दातळ 
   ९] रोटर 
  १०] फन्नी 
  ११] सरायंत्र 


                                        साधने 


      शेतीतील कामांसाठी आपल्याला विविध साधने लागतात ती आपण पाहूया    

     
     १] दोरी 
     २] तोबल  दोरी  
     ३] मीटर टेप 
     ४] सी कटर
     ५] ट्रॅक्टर
     ६] गाडी \ ट्रक
     ७] STP पम्प 
     ८] हातपंप 

     ९] फिल्टर         




                पॉलीहाउस मध्ये गुलाब लागवड करणे    

 लागवडीतील अंतर : 


                    गुलाबाची लागवड विविध अंतरावर करता 

येतेपरंतु जमिनीचा प्रकारजातीची निवड व मशागतीची पद्धत 

यानुसार पुढील अंतरावर लागवड करता येतेखड्ड्यात १ मी१ 

मी 

.५ मी.० मीवर लागवड करावीतर चरामध्ये १.५ मी

.६ मीअंतरावर लागवड करावी. 

खड्डे भरणे :
                   चर अथवा खड्डे मातीचे चांगले मिश्रण तयार करून 

भरावेतयोग्य प्रतीचे गार्डन मिक्चर (Garden Mixture) तयार 

केल्यास झाडांची वाढ चांगली होतेगार्डन मिक्श्चरसाठीखड्डयातून 

निघालेली मातीशेणखत आणि कल्पतरू सेंद्रिय खताचा वापर 

करावाखड्डे पावसाळ्यापूर्वी भरून घ्यावेत. 
लागवडीची वेळ :
                        गुलाबाची लागवड वर्षभर करता येतेपरंतु लागवड 

करताना काही गोष्टी विचारात घ्याव्यातकमी पर्जन्यमानाच्या 

भागात जून जुलै महिन्यात लागवड करावीजास्त पाऊस पडून 

पाणी साचत असल्यास ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान लागवड करणे 

फायदेशीर ठरतेमहाराष्ट्रातील हवामानाचा विचार केल्यास जून

ओक्टोबर व जानेवारी महिन्यातील कालावधी लागवडीस अधिक 

योग्य आहे. 

लागवड :
                   गुलाबाची लागवड दोन पद्धतीने केली जातेपहिल्या 

पद्धतींत निवडलेल्या अंतरावर कलमांची रोपे लावून लागवड केली 

जातेदुसऱ्या पद्धतीत अगोदर लागवडीच्या जागी खुंट लावून 

त्यावर योग्य जातीचा डोळा भरतात. 

पाणीपुरवठा :
                  गुलाबास नियमित पाण्याची गरज असतेजमिनीचा 

प्रकारहंगाम व वाढीच्या अवस्थेवर पाण्याची गरज अवलंबून असते

जमिनीत जास्त अंतराने तर हलक्या जमिनीत कमी अंतराने पाणी  
 द्यावेझाडे फुलाधारणेच्या अवस्थेत असताना पाणी कमी पडू 

नयेयाची काळजी घ्यावीहंगामाचा विचार केल्यास पावसाळी 

हंगामात १५ २० दिवसांच्या अंतराने तर उन्हाळ्यात ८ ते १० 

दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. 

ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीला पीक चांगला प्रतिसाद देतेया 

पद्धतीने पाण्याची बचत होऊन जास्त पाण्यामुळे होणारे दुष्परिणाम 

टाळतातपाण्याचे नमुने तपासून पाणी देणे योग्य असतेपाण्यात 

क्लोराइडसारखे हानिकारक क्षार असणार नाहीत याची काळजी 

घ्यावी. 
उत्पादन व गुणवत्ता वाढ :
                                      गुलाब फुलाझाडास पाणीखते व्यवस्थापन 

व इतर नियोजन अनुकूल असूनही गुणवत्ता व उत्पन्नात भर पडत 

नाहीअशा वेळी गुणवत्ता वाढीच्या पुढील पद्धती अवलंबाव्या 

लागतात. 

डी सकरिंग (De - Sukering) :
                                                      डोळा भरल्यानंतर खुंट रोपावर 
येणारे फुटवे काढण्याच्या क्रियेस 'डी संकरिंगम्हणतातकोवळी 

फूट वेळेतच काढावीअन्यथा ती डोळे भरलेल्या फांदीच्या वाढीवर 

परिणाम करते.
डोळा भरल्यानंतर वर्षभर डी सकरिंग केले जाते
 
कोवळे फुटवे झाडातील अन्न मोठ्या प्रमाणात वापरतातत्यामुळे ते 

योग्य वेळी काढून टाकणे महत्त्वाचे ठरते. 
पिंचिंग (Pinching) :
                                    वाढीच्या काळात टोकाकडील फांदीचा 

जोमाने वाढणारा थोडा भाग कापण्याच्या क्रियेस 'पिंचिंगअसे 

म्हणतातझाडास योग्य व एकसारखा आकार आणण्यासाठी 

पिंचिंग 

करतातलागवडीनंतर काही फांद्या जोमाने व उरलेल्या हळुवार 

वाढतातजोमाने वाढणाऱ्या फांद्या टोकाकडे थोड्या प्रमाणात 

कापल्यास त्यांची वाढ थांबतेआपोआप इतर फांद्यांच्या वाढीला 

संधी मिळतेयामुळे सर्व फांद्यासारख्या वाढून झाडाला आकर 

येतोपिंचिंगमुळे झाडावरील फांद्या वाढण्यास सुद्धा मदत होतेत्या

मुळे फुलांची संख्या वाढते
. 

डिस बडिंग (Dis Budding) :
                                                     गुलाबावरील लहान फुले व 

कळ्या काढण्याच्या क्रियेला 'डिस -बडिंगम्हणतातझाडावर भरपूर 

फुले आल्यास झाड त्यांना पोसू शकत नाहीत्यामुळे त्यांचा आकर 

लहान राहतोयाउलट मर्यादित फुले झाडावर ठेवल्यास फुलांचा दर्जा 

चांगला राहतोम्हणून डिस बडिंग फायदेशीर ठरतेपरंतु 

आवश्यकता असेल तेव्हाच डिस बडिंग करावे. 
मल्चिंग (Mulching) : 
                       प्लॅस्टिक कागद अथवा पालापाचोळ्याने 

दोन रोपांमधील जमीन झाकण्याच्या क्रियेस 'मल्चिंग' (आच्छादन

म्हणतातजमिनीत ओलावा टिकवून तणांची वाढ रोखण्याच्या 

उद्देशाने आच्छादन करतातआच्छादनासाठी वाळलेले गवत

पालापाचोळा व काळ्या पॉलिथिन कागदाचा वापर करावाआच्छादन 

करण्यासाठी ३०० गेजची काळी पॉलिथिन शीट योग्य असते

आच्छादनाचा हंगामानुसार चांगला उपयोग होतोपावसाळ्यात 

तणांची वाढ रोखली जाऊन उन्हाळ्यात मातीतील ओलावा टिकवून 





ठेवण्यास मदत होते. 

           

                     मुरघास


        मुरघास कसा तयार करावा ?

मुरघास तयार करताना खालील गोष्टी लक्षात घ्याव्यात  .
1) मका पीक दुधात असताना कापावे. ज्वारी फुलोऱ्यात असताना कापावी. डाळवर्गीय चारा हा फुलोऱ्यात असताना कापावा. यापासून बनवलेल्या मिश्रणाचा मुरघास हा स्वादिष्ट, रुचकर व संतुलित असतो.
2) मुरघास तयार करण्यासाठी सर्वच चारापिकांचा वापर करता येतो. काही पिके ही हिरव्या चाऱ्यासाठी उपयुक्त नसली तरी त्याचा मुरघास केला जाऊ शकतो. कडवटपणा असलेल्या पिकांपासून मुरघास बनवताना प्रक्रियेदरम्यान कडवटपणा नाहीसा होतो.
3) मुरघासासाठी मका हे पीक चांगले आहे. मुरघास बनविताना त्याच्या कापणीच्या वेळी त्यामध्ये शुष्क पदार्थ व साखरेचे प्रमाण योग्य असते. ज्वारी पिकापासूनदेखील चांगल्या प्रकारचे मुरघास बनविता येतो. गोड ज्वारीपासून बनवलेला मुरघास हे ज्वारीच्या (धान्यासाठी वापरण्यात येणारे पीक) मुरघासापेक्षा उत्कृष्ट असते.
4) एकदल व द्विदल पिकाच्या चाऱ्यापासूनदेखील मुरघास केला जातो; परंतु काही कारणामुळे मुरघास करताना विशिष्ट घटकांमुळे काही पद्धतीचा वापर करावा लागतो.
5) पिकामध्ये अत्यल्प साखर असते, जी आम्लता बनविण्यासाठी आणि जिवाणूच्या विघटनासाठी उपयुक्त असते.
6) तृणधान्य पिकामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. जिवाणूंची त्यावर प्रक्रिया होऊन अमोनिया तयार होतो, त्या बदल्यात आम्लतेचे प्रमाण कमी होते.
या चारापिकामध्ये ओलाव्याचे प्रमाण जास्त असते. जेव्हा आपण बरसीम या चारापिकापासून मुरघास बनवतो , तेव्हा त्या पिकाच्या दांड्यामध्ये पोकळी असल्यामुळे त्यामध्ये भरपूर प्रमाणात हवा राहते, जी काढून टाकण्यास जिकिरीचे काम असते.
विशिष्ट पद्धती 1) चारा सुकवून त्यामधील पाण्याचे प्रमाण कमी करणे. 2) ज्वारी, मक्‍याचा संयुक्त मुरघास बनवावा.
मुरघासाचा खड्डे –
1) मुरघास बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे खड्डे करता येतात. सिमेंट कॉंक्रीटच्या खड्डा तसेच प्लॅस्टिकच्या पिशवीचा वापर करता येतो.
2) ज्या विभागात जास्त पाऊस पडतो त्या ठिकाणी जमिनीवर टाकी बांधावी. ज्या विभागात पावसाचे प्रमाण कमी असते त्या भागात अर्धा खड्डा जमिनीत करून वरच्या बाजूला टाकीसारखे बांधकाम करावे. ज्या भागात पावसाचे प्रमाण कमी आहे तेथे संपूर्ण खड्डा जमिनीत करावा. खड्ड्याला सिमेंट कॉंक्रीटने तळाला, चोहो बाजूंनी लिंपून घ्यावे, जेणेकरून बाहेरील पाण्याचा अंश खड्ड्यामध्ये येणार नाही.
मुरघास तयार करण्याची पद्धत –
1) चारापिके 50 टक्के फुलोऱ्यात असताना कडबाकुट्टी यंत्राने लहान तुकडे करावेत.
2) एकदलवर्गीय पिकापासून आणि द्विदल वर्गीय पिकापासून मुरघास बनविताना 4ः1 प्रमाण घ्यावे. याचा रूचकर मुरघास बनतो.
3) एकदलवर्गीय पिकापासून मुरघास बनवितेवेळी एक किलो युरिया 100 लिटर पाण्यात मिसळून हे मिश्रण चाराकुट्टीवर शिंपडावे. द्विदलवर्गीय पिकापासून मुरघास बनविताना त्यावर गूळ द्रावणाचे मिश्रण शिंपडावे. यासाठी एक किलो गूळ 100 लिटर पाण्यात विरघळवून द्रावण तयार करावे.
4) अशा प्रकारची कुट्टी तयार करून खड्ड्यात एक फुटापर्यंत थर येईल अशा पद्धतीने भरावी. प्रत्येक थरानंतर वर सांगितलेले द्रावण शिंपडावे.
5) चाराकुट्टीचा थर खड्ड्यात भरताना दाब द्यावा, त्यामुळे चाऱ्यामध्ये हवा राहणार नाही. अशा पद्धतीने थरावर थर देत जाऊन खड्डा भरावा. त्यावर वाळलेले गवत किंवा कडबा यांच्या मदतीने आच्छादन करावे.
6) शेण व मातीच्या मिश्रणाने नंतर लिंपून गोलघुमटासारखा आकार द्यावा.
7) साधारण दोन महिन्यांनी चांगला, स्वादिस्ट, रुचकर असा पौष्टिक मुरघास तयार होतो.
मुरघास तयार होताना –
1) मुरघास तयार करत असताना खड्ड्यात हिरवा चारा हवाबंद करणे फारच महत्त्वाचे आहे, त्यामुळेच चारा आहे त्याच परिस्थितीत राहतो.
2) खड्ड्यामध्ये आपण हिरवे गवत, चाऱ्याची कुट्टी हे सर्व दाब देऊन भरत असल्यामुळे खड्ड्यात हवा राहत नाही. जेवढी आतमध्ये हवा असेल, ती चाऱ्यातील पेशींच्या उपयोगी पडते म्हणजेच पेशींच्या श्‍वसन क्रियेसाठी वापरली जाते. त्यानंतर हवा जर नसेल तर श्‍वसनक्रिया थांबली जाते. पेशींच्या श्‍वसनक्रियेमुळे आतमधील तापमान वाढते, त्यामुळे जे काही सडण्याच्या क्रियेमध्ये भाग घेणारे जीवाणू असतील, ते तापमान वाढल्यामुळे नष्ट होतात. खड्ड्यामधे हवा नसल्यामुळे बुरशीची वाढदेखील होत नाही. याउलट आम्लता तयार करणाऱ्या जिवाणूंच्या संख्येत वाढ होते.
3) चाऱ्यातील कर्बोदके व शर्करा यांचा उपयोग करून हे जीवाणू आम्ल तयार करतात. या आम्लात लॅक्‍टिक आम्ल भरपूर प्रमाणात असते. या व्यतिरिक्त ब्युटिरिक आम्ल, ऍसिटिीक आम्ल व इथिल अल्कोहोलदेखील थोड्या प्रमाणातच तयार होतात; पण लॅक्‍टिक आम्लाचे प्रमाण जास्त असते. आम्लतेचा सामू चार झाला तर आम्ल तयार करणाऱ्या जिवाणूंची क्रिया थांबते. मुरघास बनवत असताना काही चारापिकांमध्ये उसाची मळी किंवा पिष्टमय पदार्थ मिसळले जातात.
मुरघासाचे वर्गीकरण –
1) अत्यंत चांगला मुरघास – मुरघासास चांगला वास येतो. सामू 3.7 – 4.2 एवढा असतो. त्यामध्ये असणाऱ्या नायट्रोजनच्या प्रमाणापैकी 10 टक्के अमोनिया असतो. यामध्ये ब्युटिरिक आम्लाचा सामावेश नसतो.
2) चांगला मुरघास – समाधानकारक वास असून, त्याचा सामू 4.2 – 4.5 एवढा असतो. एकूण नायट्रोजनपैकी 10 ते 15 टक्के हा अमोनिया असतो. यामध्ये थोड्या प्रमाणात ब्युटिरिक आम्ल असते. 3) बऱ्यापैकी असलेला मुरघास – ब्युटिरिक आम्ल आढळत असल्यामुळे त्यास खराब वास येतो. सामू हा 4.5 – 4.8 च्या दरम्यान असतो, तर एकूण नायट्रोजनपैकी 15-20 टक्के अमोनिया असतो.
4) खराब मुरघास – यामध्ये ब्युटिरिक आम्लाचे प्रमाण जास्त असल्यामुळे वासदेखील खराबच येतो. त्याचा सामूदेखील 4.8 च्या वर असतो. एकूण नायट्रोजनच्या प्रमाणापैकी 20 टक्के हा अमोनिया असतो.
मुरघासाचे फायदे –
 मुरघास कोणत्याही हंगामात बनवता येऊ शकतो. हिरव्या चाऱ्यात जेवढे पोषक अन्नद्रव्ये असतात, तेवढेच पोषक अन्नद्रव्ये त्या चाऱ्यापासून तयार केलेल्या मुरघासमध्ये असतात. * कमीत कमी जागेमध्ये मुरघास बनवता येतो. वाळलेल्या चाऱ्यातून मिळणाऱ्या पोषक अन्नद्रव्यापेक्षा मुरघासातून मिळणारे अन्नद्रव्ये हे उच्चप्रतीचे असतात. मुरघास हे स्वादिष्ट, रुचकर व रसदार असल्यामुळे जनावरे वाया न घालवता संपूर्णपणे खातात. मुरघास जर दुधाळ जनावरास खाऊ घातला तर त्या जनावरापासून मिळणाऱ्या दुधाच्या उत्पादनात वाढ होते.



                                     गाईचे अंदाजे वजन काढणे 
          ज्या प्रमाणे आपण शेळीला वजन करून खाद्य  देतो. त्या प्रमाणेच गाई ला  पण आपण  वजन करूनच खाद्य दिले पाहिजे. त्याचे कारवाढले तर ते आपण ताटात तसेच ठेवतो. जनावरांचे पण तसेच आहे. त्यांना जर आपण जास्त चारा टाकला तर ते तो चारा तसाच ठेवतात व पायाखाली तुडवतात. त्यांना पाहिजे तेवढाच ते खातात. जनावरांना त्यांच्या वजन नुसार चारा दिल्यास आपल्याला समजते कि त्या जनावराला किती प्रमाणात खाद्य दिले पाहिजे.      कधी - कधी आपल्याकड चारा जास्त उपलब्ध असतो. पण ज्यावेळी आपल्याकडे चारा कमी असतो त्यावेळी आपल्याला या पद्धतीचा उपयोग होतो.     यामुळे आपला चारा वाचतो .
           गाईचे वजन मोजण्याचे सूत्र पुढील प्रमाणे   

                                        अ*अ*ब/१०,४००                                                                     

 माघील आठवड्यात मी गाई चे अंदाजे वजन करायला शिकलो ,सचिन सरानी मला शिकवला ,मीटर  टेेप च्या मदतीने  गाई   ची छाती मोजून घ्यायची त्या नंतर गाई चे माकड हाड(Monkey Bone) मोजावे सेमी.मध्येमाकड हाडा चे मोज माप =अ
छाती चे मोजमाप=ब
त्या नंतर खालील सूत्रात किमती टाकून घेतल्या
(अ *अ * ब )/(१०४००)
 आमच्या कडे असणाऱ्या गाई चे वजन मी असे काढले
अ=150
ब=152
  (१५०*१५०*१५२)/१०४००
=३२८
एवढे वजन आले .                                
माकड हाडा चे मोज माप =अछाती चे मोजमाप=बत्या नंतर खालील सूत्रात किमती टाकून घेतल्या(अ *अ * ब )/(१०४००)   आमच्या कडे असणाऱ्या गाई चे वजन मी असे काढलेअ=150ब=152  (१५०*१५०*१५२)/१०४००=३२८एवढे वजन आले . 

                                                  माती परीक्षण 
माती परीक्षण का करतात ?

शेतीतून जादा उत्पन्न घेण्यासाठी रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. मात्र यामुळे शेतीच आरोग्य धोक्यात येऊ लागलं आहे. शेतीच हे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी वेळच्यावेळी आपल्या शेतीतल्या मातीच आणि पाण्याचं परीक्षण करणं हिताच ठरतं.
जमिनीत काही विशेष दोष आढळून आल्यास त्यावर योग्य उपाय शोधणं, पिकांना दिली जाणारी खते प्रमाणशीर न दिल्याने पिकांची जोमदारपणे वाढ होत नाही.तसेच आवश्यकतेपेक्षा जास्त खते दिल्याने अनावश्यक खर्च वाढतो. मातीपरीक्षण केल्यामुळे आपल्या शेतीची अन्नद्रव्याची नेमकी गरज शेतकऱ्याला लक्षात येऊ शकते.त्यामुळे खतांच्या वापरात आणि खर्चात बचत होऊन पिकांचे उत्पादनही वाढू शकते.माती परीक्षण हे आपल्या जमिनीमध्ये कोण कोणते घटक आहेत ते पाहण्यासाठी माती परीक्षण केले जाते .
माती परीक्षणासाठी मातीचा  नमुना कोणत्या ठिकाणचा घेऊ नये .
  1. बांधाच्या कडेचा.
  2. शेतामध्ये टाकलेल्या खताच्या ढिगाऱ्या खालची घेऊ नये .
  3. जमिनीची माश्यागत करण्याच्या नंतर घेऊ नये .
  4. एकच ठिकाणची माती घेऊ नये.
  5. एकाच सरळ रेषेत नमुना घेऊ नये .
  6. नमुना पिक काढल्या नंतर घ्यावा.
माती परीक्षणासाठी नमुना कसा घ्यावा.

मातीचा नमुना घेताना झिग-झ्याग पद्धतीने घ्यावी. सदरच्या ठिकाणी इंग्रजीच्या व्ही अक्षराच्या आकृति प्रमाणे 30 सेंटीमीटर खोल खड्डा घ्यावा व त्या खड्डयातील माती बाहेर काढून टाकावी. मातीचा नमुना चाचणीसाठी खड्डयाच्या कडेची माती काढावी. अशा प्रकारे सर्व खड्डातून माती जमाकरून गोळा केलेल्या सर्व मातीचा ढीग करून त्याचे 4  समान भाग करावे. समोरासमोरील दोन भागाची माती काढून टाकावी व उर्वरीत मातीचा पुन्हा ढीग करावा व त्याचे पुन्हा 4  समान भाग करून समोरासमोरील दोन भागाची माती काढून टाकावी. ही कृती माती अर्धा किलो शिल्लक असेपर्यंत करावी. वरील माती ओली असल्यास ती सावलीत वाळवावी. ही अर्धा किलो माती प्लास्टिक पिशवीत भरावी आणि खालील माहिती एका कागदावर लिहून तो कागद पिशवीत टाकावा -
1. नमुना क्रमांक
2. नमुना घेतल्याची तारीख
3. शेतक-याचे संपूर्ण नाव
4. गाव आणि पोस्ट
5. तालुका
6. जिल्हा
7. सर्व्हे किंवा गट क्रमांक
8. नमुन्याचे प्रातिनिधीक क्षेत्र
9. बागायत किंवा जिरायत
10. मागील हंगामातील पिक आणि वाणाची जात
11. पुढील हंगामातील पिक आणि वाणाची जात
12. मातीची खोली (सेंटीमीटर मध्ये)
13. जमिनीचा उतार किंवा सपाट
14. जमिनीचे काही विशेष लक्षणे-खारवट, चोपण, आम्ल व इतर
15. पाण्याचा निचरा बरा किंवा वाईट
16. माती नमुना गोळा करणा-याची सही.
एवढे झाल्या नंतर माती परीक्षण केंद्राकडे पाठवणे.
                                        
                       जमिनीचे मोज ~ माप करणे.                                                                                                             जमिनीचे मोजमाप करण्याच्या २ पद्धती आहेत                                 १] ब्रिटीश मेथड  २] मेट्रिक मेथड   तर आपण ब्रिटीश पद्धती पाहूया.                      ब्रिटीश पद्धती                                                             यामध्ये इंच , फुट , फर्लांग. या गोष्टी येतात.                                               २५ सेमी         = १ इंच       
       १२ इंच           = १ फुट 
       १  गुंठा           = १०८९ चौफुट  
                             
अर्धा एकर        = २० गुंठे              = २१७८० चौफुट                         १ एकर              =  ४० गुंठे              = ४३५०० चौफुट                               १ १\२ एकर         =  ६० गुंठे              = ६३५४० चौफुट                               २ एकर              = ८० गुंठे               = ८४७२० चौफुट                               २.५ एकर           = १०० गुंठे             = १०५९०० चौफुट                                                                                                                                                   जमिनीचे मोजमाप करण्यासाठी प्रथमता मी एक प्लॉट निवडला. तो प्लॉट सपाट होता. त्या प्लॉटला ४ बाजू होत्या. त्या चारही बाजू असमान होत्या. प्रथमता मी त्या प्लॉटच्या बाजूंची दिशा ठरवून घेतली. त्यानंतर मी मीटरटेपच्या सहाय्याने प्लॉटच्या चारही बाजू मोजून घेतल्या. त्या बाजूना   अ. ब. क. ड. अशी नावे दिली.                                           
अ ब  = पूर्वेकडील अंतर.                                                                        
ब क = दक्षिणेकडील अंतर.                                                                     क ड = पश्चिमेकडील अंतर.                                                                     ड अ = उत्तरेकडील अंतर.                                                                 अब = ६१ फुट                                                                                        बक = १६ फुट १० इंच                                                                            कड = ५४ फुट १० इंच                                                                              डअ = १५ फुट ३ इंच                                                                                             तर आता आपण याचे क्षेत्रफळ काढूया.               तर प्लोटची दोनही बाजूंची लांबी व रुंदी असमान आहे. त्यासाठी आपण लांबी व रुंदी समान करून घेऊया.                                                          लांबी + लांबी  =  ६२  + ५४.२  =११५.०२    = ११५/२  = ५७.५                      अब  + कड                                                                                                                                                                                                         रुंदी + रुंदी   = १६.१० + १५.०३ = ३१.१३    = ३१/२   = १५.५                       अड  + बक                                                                                                  लांबी आणि रुंदी समान करून घेतली                                                        लांबी ( अब कड ) = ५७.५                                                                         रुंदी  ( अड बक ) = १५.५                                                               आयताचे क्षेत्रफळ = लांबी * रुंदी                                                                                        = ५७.५ * १५.५                                                                                        = ८९५.३ चौफुट                                                                     १ गुंठा = १०८९ चौफुट                                                                                        = ८९५/१०८९                                                                                          =  0.८२                                                                                  मी मोजलेली जमीन 0.८२ एकर म्हणजे एक एकरला कमी आहे                                                                                                                    माघील आठवड्यात मी गाई चे अंदाजे वजन करायला शिकलो ,सचिन सरानी मला शिकवला ,मीटर टेेप च्या मदतीने गाई ची छाती मोजून घ्यायची त्या नंतर गाई चे माकड हाड(Monkey Bone) मोजावे सेमी.मध्ये माकड हाडा चे मोज माप =अ छाती चे मोजमाप=ब त्या नंतर खालील सूत्रात किमती टाकून घेतल्या (अ *अ * ब )/(१०४००) आमच्या कडे असणाऱ्या गाई चे वजन मी असे काढले अ=150 ब=152 (१५०*१५०*१५२)/१०४०० =३२८ एवढे वजन आले