Wednesday 11 October 2017

विज्ञान आश्रम माहिती

माझ नाव संदेश टाव्हरे आहे.मी विज्ञान आश्रम पाबळ येथे शिकत आहे. या ठिकाणी आश्रमशाळेत राहण्याची पण सोय आहे.या ठिकाणी कोर्सचे चार विभाग आहेत. 
 १] वर्कशॉप.
 २] इलेक्ट्रिक.
 ३] अॅग्रीकल्चर.
 ४] फूडप्रोसेसिंग.
 प्रत्येक विभागासाठी ३ महिन्याचाकालावधी असतो. तर मी सर्वप्रथम अग्रीॅकल्चर  विभाग निवडलेला आहे. आम्हाला अॅग्रीकल्चर विभागासाठी सचिन लोखंडे सर शिकवतात. पहिल्या दिवशी सकाळी सर्व मुलांना एकत्र बोलवले. सर्वाना वेगवेगळे विभाग वाटून दिले. त्यानंतर आम्ही सर्व आपापल्या विभागात गेलो.पहिल्या दिवशी आम्ही सरांशी ओळख करून घेतली. त्यानंतर आम्ही काडिगवत प्लॉट मध्ये गेलो. तेथून काडीगवत कापून आणले. पॉलीहाऊस मध्ये जाऊन गवत काढले व साफसफाई केली.त्यानंतर प्लॉट व्हिजीटसाठी गेलो. विहिरीची आणि प्लॉटची पहाणी केली. रोपवाटिका पाहण्यासाठी गेलो.त्यानंतर अॅझोला बेड पहाण्यासाठी गेलो. त्यानंतर आम्ही दिवसभरात केलेल्या कामांची व जे जे पाहिले त्यावर सरांबरोबर चर्चा केली. त्या चर्चेत सरांणी आम्हाला विज्ञानआश्रमाबद्दल माहिती सांगितली.त्यानंतर ५:३० वा.सुट्टी झाली.
  विज्ञानआश्रामाची रोजची दिनचर्या ....
      रोज सकाळी  ५:३० वा. उठावे लागते. त्यानंतर प्रार्थनेसाठी ६:०० वा. व त्यानंतर व्यायामासाठी जावे लागते. तिकडून आल्यानंतर आंघोळ करायची मग ९:०० वा. नाश्ता करण्यासाठी जायचे. मग ९:३० वा.बेल होते. सर्वांना आपापल्या विभागात जावे लागते. त्यानंतर १:०० ते २:00 वा. जेवणाची सुट्टी होते. त्यानंतर परत ५:३० ला विभाग सुट्टी होते. त्यानंतर नाश्ता मिळतो. व परत ६:५५ ला MERITATION ची बेल होत. परत सर्व मुल MERITATION HALL मध्ये एकत्र जमतात व त्यानंतर ८:३० वा. जेवण व १०:०० वा. सर्वजन झोपतात.
         हि आहे विज्ञानआश्रमाची रोजची दि्नययााचर्या.

No comments:

Post a Comment